Monday, 11 April 2011

Trying to sya something to Anupam uncle.

 अनुपम खेर काकांना काहीतरी सांगायचं आहे, विषय खूप त्रासदायक आहे, पण प्रयत्न करतो.....
अनुपम काका  जंतर मंतर वर  अण्णा हजारेंना भेटायला गेले, आणि आपली राज्य घटना जुनाट झाली आहे ती बदलायला झाली आहे किंवा फेकून द्यायला झाली आहे , अशा आशयाचं काहीतरी वक्तव्यं केलं. आणि भीम सैनिकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. ह्या घटनेचे अनेक पडसाद उमटले. उलट सुलट चर्चा झाल्या. पण एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विचार करण्याचा अवयव असणारा, दलित समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला माझा मत मांडणं महत्वाचं वाटतंय म्हणून हा ब्लोग प्रपंच...
१) लोकशाही राज्यात राज्यं घटने  बद्दल काही बोलणं  म्हणजे  घटनाकाराचा अपमान करणं आणि पर्यायाने तमाम दलित जनतेचा अपमान करणं, हे अगदीच न पटण्या सारखं आहे.हे तीनही स्वतंत्र विषय आहेत.
२) राज्य घटने बद्दल आपला मत, मग ते री. पा. इ. कार्यकर्त्यांच्या   दृष्टीने चुकीचं जरी असल तरीही ते मांडण्याचा संपूर्ण अधिकार ह्याच बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेने अनुपम खेर यांना दिलाय.
३) अनुपम खेर ह्यांनी घटनेत बदल करण्याची गरज आहे, किंवा अगदी ती फेऊन देण्याच्या लायकीची झाली आहे असा मत मांडलं तर बिघडल कुठे? राज्यं घटना हि काही कायम स्वरूपी तशीच असू शकत नाही, २/३ rd  मेजोरीतिने  त्या मध्ये बदल करता येऊ शकतात अशी तरतूद बनव्नार्यांनीच करून ठेवली आहे.  
 तर मग त्यात बदल झाला पाहिजे अशी मागणी करणार्याच्या घरावर हल्ला करण्याचा कारणच काय?
४) घटना हा काही दलित समाजाचा धर्म ग्रंथ नाही.. त्यावर संपूर्ण भारत देशाची मालकी आहे. मग माझ्या बांधवांनी इतका चिडण्याचा कारण काय?
५) त्याही पलीकडे आपल्याला नाही पटलं अनुपम खेराचं   म्हणणं तर तर त्याला विरोध करूयात न, पण सानाद्शील मार्गाने.. घरावर दगड मारून आपणच घटनेचा अपमान करतोय. 
चांगल्या कामाला पाठींबा द्यायालागेलो  तर माझ्याच घरावर  हल्ला  केला? अस म्हणून अनुपम काका जर तमाम दलितान बद्दल मनात राग धरून बसले असतील तर त्यांना एकाच विनंती आहे कि कृपया दलित नेते आणि त्यांचे मुठभर अंध कार्यकर्ते यांचा मत हे सर्व दलित जनतेचा मत आहे असा समाज करून घेऊ नका. नाहीतर हि दरी अजून वाढतच जाईल.तुम्ही रागाऊ नका आपण हे सांधायचा प्रयत्न करूयात. 
आणि माझ्या भावांनो आपण सगळे भीमाची लेकरे आहोत आपल्याला आपल्या दैवताच सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच त्या महामानवाला शोभेल असाच आपण वागुयात. उलट्या बाजूची अस्पृश्यता आपल्याला नकोय. 
झाल्या कृत्य बद्दल अनुपम काकांची माफी मागावी इतकी संवेदनशीलता दलित समजा मध्ये नक्कीच आहे. So Anupam uncle I've tried to say something to you, hope you will take it easy for the sake of humanity.
Jay Bheem. :-)

3 comments:

  1. फारच छान. ज्याला माझं म्हणणं पटत नाही, तो माझा शत्रू, लोकशाही विरोधी, त्याला संपवला पाहिजे वगैरे लाईन, सर्व अविचारसरणीच्या लोकांमध्ये प्रिय आहे. त्याला विरोध करणारे सहसा व्यक्त होत नाहीत. त्यामुळे तुझ्या लिखाणाचे महत्व आहे.

    ReplyDelete
  2. Spasht mat aplya mhanaje bhartiyanna tehi samnya mansane dyachi tashi paddat nahi apan char chaughat bolanar gappa marnar ani gappa basnar he janu gruhitach dharlele aste. Tyamule tuzya vyakt honyala ek vishesh mahatva aahe. Apan saglyat pratham ek manus prni aahot he apan saglech visarat chalelo aahot. mhanaje manus visrat challoy pan pranyala motha kartoy. Apan konache konitari ahot pan manus matra nahi.

    ReplyDelete
  3. मित्रा...असा सारासार विचार करणारे ज्या वेळेला समाजात जन्माला येतील तो सुदिन म्हणायचा..तुझ्या विचाराबद्दल अभिनंदन आणि १५०% सहमत...बेष्ट....!!

    ReplyDelete