Monday 19 September 2011

स्केच पेन ने झाकलेली संस्कृती?

त्या गुरुवारी  करायला फारसं काम नव्हतं म्हणून सिनेमाला गेलो. अगदी  "first day first show " ला. Now Showing म्हणून जो काही दाखवतील तो सिनेमा बघावा असाच मूळ प्लान असल्याने तिकीट काढलं, खुर्चीच्या गोल खाच्यात ठेवायला काहीतरी असावं म्हणून ग्लासभर पेप्सी घेतल आणि विजेरीच्या उजेडात अंधार्या गारव्यात जाऊन बसलो. गुबगुबीत खुर्ची पाठ मागे ढकलावी आणि मस्त ताणून बसावं, पण म्हटलं नको आधी राष्ट्र गीत होऊन जाऊ द्यावं. तसेही बरेच दिवस झाले होते राष्ट्रगीत म्हणून ... हो गेल्या वेळीही  सिनेमाला मी उशीराच नव्हतो  का पोहोचलो? पण पडद्यावर राष्ट्रगीता ऐवजी डायरेक्ट "केंद्रीय फिल्म निर्माण बोर्डाचं" सर्तीफिकेतच आलं. असं  कसं  झालं म्हणता म्हणता यशराज फिल्म्सच animation येऊन गेलं. आणि यश राज  वाल्यांनी तुमच्या मनाचा पगडा घेतल्यावर देश प्रेम वगैरे काही सुचतं होय  ? माझंही तसच झालं असावं... इकडून तिकडून येणाऱ्या dollby च्या आवाजात रमून मी पण सिनेमा पाहू लागलो. "मेरे ब्रदर की दुल्हन".  आयला म्हणजे भाभिसा? ? म्हणजे हिंदी सेरीअल मध्ये जिला 'मा' समान मानतात त्या भाभी वर हा लाईन  मारणार कि काय? असा सामान्य विचार करत मी पण सिनेमा पाहू लागलो. पहिलाच प्रसंग इंग्लंड मधला होता.. हिरो न त्याची girl friend ह्यांच्यात भांडण होतं... आणि भांडता भांडता ती त्याला, "तुम्ही Indians असेच cheap असतात." अशा आशयाचं काहीतरी म्हणते. त्या वाक्यावर सिनामागृहाच्या एका कोपर्यातून चक्क टाळ्या पडल्या..??? च्यायला म्हटलं हा काय त्रास आहे? म्हणून आवाजाच्या दिशेने पाहिलं तर अत्यंत सामान्य चेहऱ्याची काही पोरं आणि पोरी खूष होऊन त्या वाक्यावर हसत होती. मी शॉक लागल्या सारखा भानावर आलो आणि माझ्या लक्षात आलं की आपण दुबई मधल्या थिएतर मध्ये सिनेमा बघायला आलो आहोत. कामा निमित्त इथे आलो होतो. इथे जुम्म्याच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते म्हणून वीक एंड ला म्हणजे गुरुवारीच नवा सिनेमा लागतो. मी एकटाच होतो, फारसं काम नव्हतं म्हणूनच तर इथे येऊन बसलो नाही का? राष्ट्रच आपल नाही तर राष्ट्रगीत कसं वाजेल?  अंधारात जरा आजूबाजूला चाचपण्याचा प्रयत्न केला तर जाणवलं  की शेजारी पाकिस्तानी, सुदानी, बांगलादेशी, थोडे फार मिसरी  (एजीप्त्शियांस),काही आफ्रिकन आणि बरेच से डोक्यावर पांढर फडकं न कुकरची रिंग  अडकवलेले अरब पण होते. "मेरे ब्रदर की दुल्हन" मध्ये "वास्तव" चं भान येऊन मी पुन: स्क्रीन कडे वळे पर्यंत   ती girl friend त्याच्याशी ब्रेअक उप करून  निघून पण गेली होती. परदेशात बसून सिनेमा बघण्याचा माझा  हा पहिलाच अनुभव होता, असा सक्षात्कार झाल्याने मला अजूनच भारी वाटत होतं. आणि भारताची sorry हिंदुस्तानची टवाळी झाल्यावर पाकिस्तानी लोकांना भारी वाटलं... ह्या बद्दलचं माझं आश्चर्य पण थोडं कामी झालं. आपल्या कडे पण स्क्रीन वर पाकिस्तानची मारली गेली की शिट्ट्या, टाळ्या पडतातच की.. कराचीत कदाचित आख्ख्या थिएतर्ने टाळ्या वाजवल्या असत्या, पण इथे आम्ही विविध देशी एकत्र असल्याने एका ठराविक group मधून टाळ्या आल्या असतील.    
यशराजस च्या फोर्मुल्या प्रमाणे नंतर अर्थातच फिल्म देखील भारतात आली, थोड्या फार फरकाने तोच भारतीय लग्नाचा माहोल  होता... पंजाबी ठेक्याचं गाणं सुरु झालं तर तो " टाळ्कूट्या "  ग्रुप मस्तं डोलत होता. माझ्यातला भारतीय  लगेच म्हणाला," आता का?" पण त्यांना माझ्या सारख काही वैचारिक वगैरे काही सुचत नसावं, ते तल्लीन होऊन टबातले  popcorns चावत "नाचे मधुबाला " एन्जोय करत होते. आणि मी उगाच आपला वाघा बोर्डर वर उभा. त्यानंतर अली (म्हणजे सिनेमातला "भाई साहब ".. brother ) तो भारतात land   होतो तेंव्हा  पुन: त्या ग्रुप मधून शिट्टी आली. म्हटलं  आता काय? ???  ok ok !  अली जफर हा  पाकीस्तानी कलाकार आहे नाही का?   आता मात्र शुद्ध करमणूक म्हणून तो सिनेमा पाहणं मला अशक्यच  झालं. एका दुल्हन साठी चाललेलं त्या दोन भावान मधलं भांडण राहिलं बाजूला आणि माझ्या मनातच द्वंद्व सुरु झालं.. इतका राग आहे आमच्या देश बद्दल तर नका बघू आमचे सिनेमे.इति १ मन. पण फक्त "आमचे" म्हणावे इतके संकुचित राहिलेत का हिंदी सिनेमे?- दुसरं मन. पण  ती दोन वाक्य वगळता बाकी दोन तास २३ मिनिटांचा सिनेमा त्यांनी आपला म्हणून पहिलाच ना. कतरिनाने गिटारच्या तारांवर एक स्ट्रोक मारला तेंव्हा ह्यांच्या मनात पण झीन्झीनाट  झालाच ना?  लो वेस्ट जीन्स मधून डोकावणारा तिच्या कामरेवारचा टाटू पाहून गुदगुल्या झाल्याच ना? दिग्दर्शकाला जिथे त्यांनी रडण अपेक्षीत होतं, जिथे हसण अपेक्षीत होतं, जिथे नाचण अपेक्षीत होतं ते ते सगळं त्यांनी केलच ना? मग अत्यंत नैसर्गिक  भावनेतून आलेल्या 'त्या' टाळ्या न शित्त्यांकडे आपण दुर्लक्ष  नाही का करू शकत?  पण मनातला भारतीय काही ऐकायला तयार नव्हता. आणि मला काळजी वाटायला लागली होती की  ह्या वातावरणात  तो हळू हळू 'हिंदुस्तानी' तर होत नाहीये ना? भारतात प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी इथे U .A .E मध्ये हिंदी सिनेमा प्रदर्शित होतोय. तोही house full आहे. बच्चन साहेब आणि शाहरूख भाई चे fans जगभरात आहेत. रशियन लोकांना राजकपूर अजूनही आवडतो. असं जरी असलं तरी त्यांना त्यांच्या त्यांच्या देशाची अस्मिता असणारच ना. च्यायला! असं तर नाही की आपले न पाकिस्तान मधले प्रोब्लेम्स हे देखील ह्या सिनेमावरच्या प्रतिक्रिये सारखे '२ ठिकाणच्या टाळ्या' विरुद्ध ' २ तास २३ मिनिटांचा सिनेमा' अशाच प्रमाणात आहेत ??? म्हणजे काही किरकोळ "सियासती मसले " सोडले तर बाकी आपल्या दोघांची कतरीना एकच तर नाही? आजचा हा अनुभव बघता आपल्या आवडी निवडी all most  सारख्या, आपली संस्कृती की काय ती  सारखी, भाषा सारखी, माती सारखी, खाण्या पिण्याच्या सवयी सारख्या, कातडीचा रंग सारखा मग तरीही आमच्या मनांच्या बोर्डरवर कायम तणाव का? 
जर का ९८% सिनेमा आम्ही एकत्र छान एन्जोय करू शकतो तर मग २% वादाला इतक महत्व द्यायला नको, नाही का? आपले परराष्ट्र मंत्री, राजदूत काय झक मारतात? मला तर वाटायला लागलंय की दोन्ही देशांतले संबंध सुधारण्याच  काम यशराज वाल्यांनाच सोपवलं तर दोन पाच वर्षत हे २% वाद मिटूनही जातील. (स्वप्नं पाहण्यावर  तर सोडाच पण दुबई मध्ये इन्कम टक्स पण लागतं नाही ;-) . )
अखेर भाभी होताहोता ती त्याची दुल्हन झाली आणि तत्परतेने झाडू मारायला सरसावलेल्या थिएतर च्या पोरांना चुकवत गर्दी Exit च्या दिशेने चालू लागली. अर्थातच प्रत्येकजण आत्ता समिक्षक झाला होता. २५ दिर्हाम्स (अरबी चलन )  मध्ये यशराजची  अक्कल काढत होता. दिग्दर्शकाने म्हणे जेंव्हा इम्रान खानला ह्या सिनामाची पटकथा ऐकवली तेंव्हा त्याने फिल्म नाकारली होती. पण त्याच्या आईने स्क्रिप्ट वाचून त्याला ही फिल्म करायला भाग पाडलं. एखाद वेळी नसतं ऐकल आईचं तर बरं झालं असतं असं माझ्यातल्या समिक्षकाला  पण बाहेर जाता जाता वाटत होतं. 

पार्किंग कडे जाताना ह्याच फिल्मच्या पोस्टर कडे नजर गेली. मोठ्या मुश्किलीने घालवलेला डोक्यातला देशप्रेमाचा किडा परत वळवळला. मुळच्या पोस्टर मध्ये इम्रान wheel chair वर बसलेला आहे आणि कतरीना chair ढकलते आहे, असं चित्रं आहे. . तिने (अर्थातच ) मिनी स्कर्ट आणि स्लीव लेस top घातलेला आहे. पण गम्मत म्हणजे दुबैतल्या ह्या  थिएतर मध्ये लावलेल्या पोस्टर  मध्ये गुलाबी स्केच पेन ने रंगून तिच्या स्कर्ट खाली घोट्या पर्यंत legings (pant ) आणि मनगटापर्यंत स्लीव्स रंगवल्या होत्या.

त्याचं कारण असं की इथल्या कायद्या नुसार तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी असे शरीर उघडे टाकणारे कपडे घालता येत नाहीत. जागो जागी असे फलक असतात की " ware respectfull clothes .' वगैरे. हॉटेलच्या रूम मध्ये visitors साठी guide असतं. त्यात पण सूचना असते की पाहुण्यांनी छोटे कपडे घालू नये म्हणून. त्यात बाईने तर नाहीच नाही. आणि मग प्रत्यक्षात नाही तर मग पोस्टर मध्ये पण नाहीच .  च्यायला! हा आणि काय त्रास? म्हणजे आत सिनेमात तिचा  डिप नेकचा गळा बघून शिट्टी वाजवायची न बाहेर तिला स्केच पेन ने रंगवून झाकून ठेवायची?? ही संस्कृती आपल्या आकलनाच्या बाहेरची आहे यार. एकतर मिनी स्कर्ट ला अश्लील समजू नका. तो घातलेल्या नायिकेला बघून छान वाटत असेल तर त्याचं आनंद घ्या. नाही तर मग, भारतीय "(आमचे)  सिनेमे अश्लील असतात म्हणून बंदी तरी घाला. हे म्हणजे " आपली ठेवावी झाकून अन दुसर्याची पहावी वाकून..." वाली बात हो गायी. (Sorry ) असं दुटप्पी नाही वागायच. hight   तर तेंव्हा  झाली जेंव्हा हॉटेल वर गेल्यावर "झी aflam " ह्या झी च्या अरेबिक वाहिनीवर ह्याच सिनामा बद्दलच्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया दाखवत असतांना मी पहिल्या. दोन अरबी पुरुष आणि एक महिला बोलत होत्या.. तेच ते ,"फिल्म time pass आहे, गाणी मस्तच आहेत bla bla bla ... " पण हे सगळं ती मुलगी बुरख्याचा पडदा हाताने घट्ट धरून सांगत होती. इतकं वाईट वाटलं ट्या मुली बद्दल... म्हणजे तिने कतरिनाला बिनधास्त मनमौजी पणा करतांना बघायचं आणि नंतर आपल्याला काय वाटलं ते बुरख्या आडून सांगायचं???

दुर्दैव सालं मला भाषा कळत नसल्याने ती काय म्हणते आहे ते नीटसं समजलं नाही. पण सौदी अरेबिया मध्ये बायकांना गाडी चालवण्याचा अधिकार  नाही. कार  आहे पण अधिकार नाही.. आणि घरातला बाप्या किराणा  आणून देणार नाही पोरांना शाळेत सोडायला पण जाणार नाही. ते सगळं बाई  नेच करायच  आणि गाडी पण चालवायची नाही? तिथल्या काही पोरी भांडता आहेत म्हणे  संस्कृती रक्षाकानशी. (To support them pls contact Ms. manal Al Sharif on tweeter or F.B) 
 पुढच्या वेळी भारताला शिव्या देण्या आधी क्षणभर विचार   करावा की काय ,असं वाटू लागलंय ? म्हणजे.. आपल्या पोरी त्यामाने बऱ्याच बऱ्या अवस्थेत जगात आहेत. अर्थात " बऱ्याच बऱ्या" हे लज्जास्पद वास्तव आहेच. पण तरीही... 
यार! अशी स्केच पेन ने खोटी खोटी झाकून ठेवलेली ही काय संस्कृती म्हणायची?
च्यायला.......!    time पास म्हणून सिनेमाला गेलो होतो पण डोक्याचा भूगा  करून परत आलो.